PM Security laps : पंजाब आणि केंद्रीय गृहमंत्रालय चौकशी करणार, सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी
Continues below advertisement
पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत त्रुटी आढळून आल्यानं देशभर खळबळ उडाली आहे. आणि हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय. आज सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर सुनावणीसाठी असलेलं हे पहिलं प्रकरण आहे. सरन्यायादीश रमण्णा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठासमोर या प्रकरणाची चौकशी होणार आहे. या प्रकरणाची खुद्द राष्ट्रपतींनीही दखल घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यात या मुद्द्यावरून चर्चाही झाली.. दरम्यान याच प्रकरणावरुन केंद्र सरकारच्या निशाण्यावर असलेल्या पंजाब सरकारनं देखील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. तर शिवसेनेनंही चाबाबत चिंता व्यक्त करत चौकशीची मागणी केलेय. पंजाबमध्ये उड्डाणपुलावर काही आंदोलकांनी पंतप्रधानांचा ताफा तब्बल २० मिनिटं अडवून ठेवला होता.
Continues below advertisement