PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार Mahakaleshwar Corridorचं उद्घाटन

Continues below advertisement

भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर आहे. पुराणातही या मंदिराचा महिमा सांगण्यात आलाय. याच उज्जैनमधील महाकालेश्वर कॉरिडॉरचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सहाशे कलाकार आणि साधू संतांच्या मंत्रोच्चारासह हा कॉरिडोअरच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  या सोहळ्यात महाराष्ट्र भाजपही सहभागी होणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध महादेवाच्या मंदिरात प्रमुख भाजप नेते उपस्थित राहणार आहेत.  महाकाल कॉरिडोअरच्या उभारणीने धर्मनगरी उज्जैनला नवी ओळख मिळणार आहे. महाकाल प्रांगणात सुमारे दोनशे लहान मोठ्या मूर्ती आणि 108 स्तंभ तयार करण्यात आलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram