ITALY मध्ये पंतप्रधान मोदी जेव्हा मराठीत बोलतात, नागपूरच्या माही गुरुजींसोबत मोदींचा मराठीतून संवाद!
G20 and COP26 Summit : जी 20 परिषदेसाठी इटलीच्या रोममध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इटलीमधील भारतीयांची भेट घेतली. यावेळी त्यांची भेट मूळचे नागपूरचे आणि गेली 2 दशके इटलीत राहणारे महेंद्र शिरसाट उर्फ माही गुरुजी यांनी घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत मराठीत संभाषण केलं याला मोदींनी देखील मराठीत उत्तरं दिली. तसेच मराठीत संवाद साधत मोदींनी देखील त्यांची माहिती विचारली.