Aryan Khan साठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार, आर्यनचा तुरुंगवास आज 26 दिवसांनंतर संपणार
Aryan Khan Bail : किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आज आर्थर रोड कारागृहातून बाहेर येणार आहे. परवा आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पण जामिनाची प्रत तुरुंगात वेळेत पोहचली नाही म्हणनू आर्यनची कालची रात्र तुरुंगातच गेली. आज पहाटे 5.30 वाजताच आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यामुळे आता आर्यनच्या जामिनासाठीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सकाळी 8-9 वाजता आर्यनचा तुरुंगवास संपण्याची शक्यता आहे. सकाळी 8-9 दरम्यान आर्यन त्याचं घर मन्नत बंगल्याकडे रवाना होईल असं कळतंय.