नव्या वर्षात दोन स्वदेशी कोरोना लस विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांचा अभिमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नॅशनल मेट्रोलॉजी कॉन्क्लेवमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी यावेळी कोच्ची-मंगळुरु गॅस पाइपलाइन देशाला समर्पित केली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "नवं वर्ष देशासाठी नव्या आकांशा घेऊन आलं आहे. नव्या वर्षात देशाला दोन मेड इन इंडिया कोरोना वॅक्सिन मिळाल्या आहेत. देशाला संशोधकांवर गर्व आहे आणि त्यांचं हे योगदान नेहमीच लक्षात राहिलं."
पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावेळी भारतासमोर नवं ध्येय, नवी आव्हानं आहेत, आणि भारत या सर्वांचा सामना करत आहे. नव्या दशकात गुणवत्ता आणि मापाच्या दिशेत नवी दिशा देणं गरजेचं आहे. जगभरात सध्याच्या घडीला भारताची उत्पादनं कुठे-कुठे आहेत, यासाठी मेट्रोलॉजीचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे.
Continues below advertisement