Mumbai Corona Updates | मुंबईत कोरोनामुळं तिघांचा मृत्यू; मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी आकडा

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नव्या प्रकाराची जगभरात दहशत असतानाच, सावधगिरी म्हणून भारतातही फार आधीपासूनच काही महत्त्वाचे निर्णय घेत निर्बंध लागू करण्यात आले. मागील वर्षभरापासून कोरोनाचं संकट भारत आणि संपूर्ण जगापुढं एक मोठं आवाहन होऊन उभं ठाकलं आहे. पण, त्यातही सध्याच्या घडीला भारतात रुग्णसंख्येचा दर दिलासा देणारा ठरत आहे.

एकेकाळी सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रातही सध्या परिस्थिती सुधारत आहे. इतकंच नव्हे, तर झपाट्यानं वाढणारी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात मुंबईतील आरोग्य यंत्रणांनाही यश मिळालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola