
Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रिया
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचं कमळ फुललं. मात्र त्याहूनही मोठा धक्का आपला बसला तो म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांना पराभूत करत भाजपचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले. त्याचबरोबर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियाही या निवडणुकीत पराभूत झाले. जंगपुरा मतदारसंघातून सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या तरविंदरसिंग मारवाह यांच्याकडून सिसोदिया पराभूत झालेत. केजरीवाल आणि सिसोदियांच्या पराभवाचा सर्वात मोठा धक्का आपला सहन करावा लागलाय.
Continues below advertisement