Mann Ki Baat | भारताच्या भूमीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले : पंतप्रधान मोदी
भारत संरक्षणक्षेत्रात पुढे जात आहे. भारत मैत्री करणे जाणतो आणि उत्तर देणे ही जाणतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला गर्भित इशारा दिला आहे. ते म्हणाले की, आम्ही जे काही करतो, ती देशसेवाच असते. आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. भारतमातेकडे डोळे वर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे. वीरपुत्रांच्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहेत. या वीरपुत्रांचे माता-पिता धन्य आहेत, असं मोदी यावेळी म्हणाले.