PM Modi Meet कोरोना स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या पश्चिम बंगालमधील उद्याचा दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या उच्च स्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या पश्चिम बंगालला जाणार नाही. पंतप्रधान मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्या पश्चिम बंगालला जाणार होते. परंतु पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी पाच वाजत व्हर्च्युअल रॅली करणार आहे.