PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) आज संध्याकाळी पाच वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असला तरी दररोजचा मृतांचा आकडा मात्र धडकी भरवणारा आहे. त्यामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.