PM Modi To Address Nation : लसीकरण मोहीम व्हीआयपी कल्चरपासून दूर ठेवली : पंतप्रधान

Continues below advertisement

PM Modi To Address Nation :  100 कोटी कोरोना लसीकरणाचं कठीण पण असाधारण लक्ष्य पार केलं. या पाठीमागे देशातील 130 कोटी जनतेचं सहकार्य आणि कर्तव्यशक्ती आहे. यासाठी सर्व भारतीयांचं अभिनंदन करतो. 100 कोटी लसीकरण फक्त ही फक्त संख्या नाही, देशातील जनतेच्या सामर्थ्याचं प्रतिबंब आहे. नवीन भारताची ही ताकद आहे. ज्या वेगानं आपण 100 कोटींचा टप्पा पूर्ण केला, त्याचं जगभरातून कौतुक करण्यात येत आहे. कोणताही भेदभाव न करता लसीकरण करण्यात आलं. यामध्ये व्हीआयपी कल्चरचा शिरकाव करु दिला नाही. जे बड्या देशांना जमलं नाही ते भारतानं करुन दाखवलं, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं विज्ञानवादी दृष्टीकोनातून मोहिमेला यश आल्याचं पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. 

आज अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना जगभरातील इतर देशांसोबत करत आहे. भारताने ज्या वेगानं 100 कोटींचा आकडा पार केला त्याचं कौतुकही होत आहे. हे सर्व सुरु असताना आपण सुरुवात कुठून केली हे विसरत आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीला भारताला लस मिळेल का? भारत किती जणांचं लसीकरण करु शकतो? भारत कोरोना महामारीला थोपवू शकतो का? यासारख्या सर्व प्रश्नांना 100 कोटी लसीकरण उत्तर देत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram