PM Modi To Address Nation Today : पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता देशवासियांना संबोधित करणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi To Address Nation Today: काल देशानं कोरोना लसीकरणात एक महत्वाचा टप्पा पार केला. देशानं 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि देशवासियांचे आभार मानले. आज या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे.
कोरोना लसीकरणासह मोदींच्या संबोधनात काश्मीरमधील घडामोडींवर देखील भाष्य होण्याची शक्यता आहे. काल देशातील लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला. यानंतर बोलताना मोदींनी म्हटलं होतं की, ही भारतासाठी गौरवास्पद कामगिरी असून हे यश देशातील 130 कोटी जनतेचं आहे. हे यश साध्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तसेच आंत्रप्रुनर्स यांचं पंतप्रधानांनी आभार मानले होते. 21 ऑक्टोबर 2021 या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं.