Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

Continues below advertisement

Independence Day 2026 PM Modi Speech : देश आज आपला 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Speech) यांनी प्रथेप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची ही 13 वी वेळ आहे. 2014 मध्ये, जेव्हा ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी देशाला पहिल्यांदा संबोधित केले होतं. (Independence Day 2026)

दरम्यानपंतप्रधान मोदींनी यावेळी देशाला संबोधित करताना आगामी काळातील भारताच्या विकासाचा रोडमॅप सादर केला. (PM Modi speech at Red Fort) तसेच आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदींनी युवक आणि ऊर्जा संकटासंबंधीच्या घोषणांसह अनेक मोठ्या घोषणा केल्यापंतप्रधानांच्या संबोधनात त्यांनी कोणत्या 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, हे जाणून घेऊया. (Independence Day 2026 PM Modi Speech) 

1) युवकांसाठी एआय कौशल्य प्रशिक्षण

पंतप्रधान मोदींनी युवकांना एक महत्त्वपूर्ण भेट दिली आहे. ते म्हणाले, "आम्ही नुकतेच 'एआय इम्पॅक्ट समिट' आयोजित केले होते. एआय वेगाने पसरत आहे. लाल किल्ल्यावरून मला देशातील युवकांसाठी एक घोषणा करायची आहे, आम्ही पुढील वर्षभरात 1 कोटी युवकांना एआय कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून आपल्या युवकांमध्ये एआयच्या जगात नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण होईल."

2) मोफत ऑनलाइन कोचिंग

पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोचिंग क्लासेसची स्पर्धा मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक मोठे ओझे बनली आहे. प्रत्येक पालकाला वाटते की, जर त्यांनी आपल्या मुलाला कोचिंग सेंटरमध्ये पाठवले नाही, तर ते कुठेतरी मागे पडतील किंवा त्यांना चांगल्या कुटुंबातील मानले जाणार नाही." गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या चिंता लक्षात घेऊन, आम्हाला कोचिंगवर खर्च होणारे हजारो कोटी रुपये वाचवायचे आहेत. आमचे तरुण त्यांच्या कुटुंबांच्या जवळ राहू शकतील, त्यांची काळजी घेतली जाईल आणि ते अतिरिक्त आर्थिक भार टाळू शकतील. म्हणूनच, आम्ही आमच्या तरुणांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरिता मोफत ऑनलाइन कोचिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि अत्यंत प्रतिभावान शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ आहेत. ही संसाधने एकत्र आणून, आम्ही देशातील तरुणांना मोफत कोचिंग देऊ आणि या उद्देशासाठी एक संपूर्ण नेटवर्क तयार करू.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola