Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

Continues below advertisement

ABP Majha LIVE : पुण्यातील एका अध्यात्मिक गुरुंची व्हिडीओची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा आहे. उमेश तागुंदे नावाच्या या गुरुंच्या शिष्या त्यांचे पाणी आणि दुधाने पाय धुऊन ते दुध प्राशन करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. उमेश तागुंदेंचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक दोन नाही, तर असे अनेक शिष्य आणि शिष्या उमेश तागुंदेंचे पाय धुऊन पाणी पिताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यामुळे हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे का? असा प्रश्न एबीपी माझाने अध्यात्मिक गुरू असलेल्या उमेश तागुंदे यांना विचारला. यावर आपण भक्तांना पाय धुऊन पाणी पिण्याचे कोणतेही आदेश देत नाही, भक्त स्वतः हून पाय धुऊन पाणी पितात आणि मी स्वतःही माझ्या गुरुंचे पाय धुऊन पाणी पितो, असं उत्तर उमेश तागुंदे यांनी दिलं. तसेच मी माझे पाय धुण्यास भक्तांना विरोध करतो, असंही उमेश तांगुदे यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola