PM Modi Full Speech Ayodhya : शतकानुशतकाची जखम आज भरुन निघालीराम मंदिर ध्वजारोहणानंतर UNCUT भाषण

Continues below advertisement

PM Modi Full Speech Ayodhya : शतकानुशतकाची जखम आज भरुन निघालीराम मंदिर ध्वजारोहणानंतर UNCUT भाषण 

Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony: उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राममंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) शिखरावर आज (25 नोव्हेंबर) दिमाखात धर्मध्वज (Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony) फडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. 

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं (Ram Mandir Flag Hoisting Ceremony) बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर धर्मध्वज फडकला. कोविदार वृक्ष, तेजस्वी सूर्याची प्रतिमा चिन्हांकीत झालेला भव्य ध्वज विधीवत पूजन करून फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी आणि सरसंघचालकांनी एकत्र श्रीरामाचं पूजन करून ध्वजारोहण केलं. ध्वजारोहणासाठी हजारो भाविक अयोध्येत जमले होते, प्रभू श्रीरामाचा जयघोष आणि मंत्रोच्चारांच्या साथीने मंदिरावर भव्य भगव्या रंगाचा धर्मध्वज फडकला.  

भगवा ध्वज हवा चिरत राम मंदिराच्या कळसावर जाऊन स्थिरावला-

राम मंदिराचा हा धर्मध्वज मंत्रघोषांच्या उच्चारात बटन दाबताच कळसाच्या दिशेने वर जाऊ लागला. हवेचा प्रचंड जोर असतानाही हा धर्मध्वज 191 फूट उंचावर असलेल्या राम मंदिराच्या कळसावर अचूकपणे जाऊन स्थिरावला.  पंतप्रधान मोदी आणि उपस्थित जनसमुदाय खाली उभे राहून डोळ्यांमध्ये हे दृश्य साठवत होता. मात्र, धर्मध्वज मंदिराच्या कळसावर स्थिरावला तेव्हा पंतप्रधान मोदी  यांचे मन दैवी भावनांच्या संचाराने अक्षरश: सद्गतित झाले. धर्मध्वज मंदिराच्या कळसावर पोहोचला तेव्हा खाली उभ्या असलेल्या नरेंद्र मोदींचे जोडलेले हात भावना आवेगाने थरथरताना दिसले. हे दृश्य पाहून उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola