PM Modi Security : प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोका, सरक्षा यंत्रणांना 'हायअलर्ट'

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत मोठी बातमी आहे. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांच्या गोपनीय अहवालातून समोर आलीय. इंडिया टुडेनं हे वृत्त दिलं आहे. देशाच्या प्रजासत्ताक दिनी सुरक्षेसाठी यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत. भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला आशियायी देशांतील मोठ्या नेत्यांना आमंत्रित करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कजाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या राष्ट्रांच्या मान्यवरांचा समावेश असेल. या अहवालात असंही सांगण्यात आलं आहे की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या क्षेत्राबाहेरील गटांकडून हा कट रचला जाऊ शकतो. या गटांचं उद्दिष्ट मोठ्या पदावरील मान्यवरांना लक्ष्य करणं आणि सार्वजनिक मेळावे, महत्त्वपूर्ण आस्थापने आणि गर्दीच्या ठिकाणी दहशत निर्माण करणे हा आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram