PM Modi | Parijat Tree | ... म्हणून राम मंदिर परिसरात मोदींनी पारिजातकाचं रोपटं लावलं!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. पंरप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत जवळपास तीन तास अयोध्येत थांबणार आहेत. यादरम्यान त्यांनी राम मंदिराच्या परिसरात पारिजातकाचं रोपटं लावणालं. त्यानंतर भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी रवाना झाले. वेद-पुराणांमध्ये पारिजातकांच्या झाडाचं अत्यंत महत्त्व सांगण्यात आलं आहे.
पारिजातकाबाबत एक कहाणी अशी सांगण्यात येते की, हे झाड साक्षात श्रीकृष्ण स्वर्गातून धरतीवर घेऊन आले होते. सत्यभामेचा हट्ट पुरवण्यासाठी हे झाड श्रीकृष्णाने धरतीवर आणलं अशी अख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर ते गुजरातमधील द्वारकेत स्थापित करण्यात आलं. त्यानंतर अर्जुनाने द्वारकेतून संपूर्ण पारिजातकाचं झाड घेऊन आला आणि ते उत्तर प्रदेशातील किंतूर गावात लावलं. हे झाड पाहण्यासाठी देशभरातून अनेक भाविक येत असतात. तसेच या वृक्षाच्या संवर्धनासाठी विविध स्तारांमधून प्रयत्न केले जात आहेत.