EXCLUSIVE | राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त प्रभू रामललासाठी रत्नजडीत पोशाख

Continues below advertisement
 प्रभू श्रीराम यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे. सर्वांच्या स्वप्नातलं राम मंदिर अखेर साकारण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमीपूजन पार पाडणार आहे. भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली असून जवळपास सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या सोहळ्यानिमित्त अयोध्येत रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशातच राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त प्रभू रामललाला हिरव्या आणि भगव्या रंगाची वस्त्र परिधान करण्यात आली आहेत. दरम्यान, रामललाची वस्त्र मलमलच्या कपड्यांनी तयार करण्यात आली आहेत. या वस्त्रांवर 9 प्रकारची रत्न लावण्यात आली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram