PM Modi On Housing : स्मॉल अर्बन हाऊसिंगवर अनुदानित कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना

Continues below advertisement

मोदी सरकार घर खरेदी करणाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे, यासाठी केंद्र सरकारनं ६० हजार कोटी खर्च करुन योजना आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याद्वारे स्मॉल अर्बन हाऊसिंगवर अनुदानित कर्ज उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाषाणातून या योजनेसंदर्भात भाष्य केलं होतं. या योजनेत ९ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर ३ ते ६.५ टक्के वार्षिक व्याज अनुदान दिलं जाईल. शहरी भागातील कमी उत्पन्न गटातील, कर्जासाठी अर्ज करणाऱ्या २५ लाख अर्जदारांना या योजनेचा फायदा होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचपार्श्वभूमीवर आगामी काळात बँका काही महिन्यांतच ही योजना सुरू करू शकतात. शिवाय आगामी पाच राज्यांच्या विधानसभेची निवडणूक आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना अंमलात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram