पंतप्रधान नरेंद्र मोदींची 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पंतप्रधानांनी कोणते मुद्दे मांडले?
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा एक आव्हानात्मक परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा लोक बेजबाबदार दिसत आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.