PM Modi Speech : तुम्ही शत्रूला कायमच चोख उत्तर दिलंय;पंतप्रधान मोदींची नौशेरातील सैनिकांसोबत दिवाळी

Continues below advertisement

PM Modi Diwali Celebrations : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी जवानांना संबोधित केलं. त्यावेळी मोदी म्हणाले की, मी एक कुटुंबातील सदस्य म्हणून आलोय आणि 130 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन आलोय. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुमच्याकडून मी एक नवी ऊर्जा घेऊन जाणार आहे. देशाची सेवा करण्याचं सौभाग्य सर्वांना नाही मिळत. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला असं वाटतंय की, तुम्ही दृढ निश्चयानं भरलेले आहात आणि हा निश्चय आणि पराक्रमाचा आत्मा भारत मातेचं संरक्षण कवच आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा मी नौशेराच्या धरतीवर उतरलो, त्यावेळी मन रोमांचानं भरुन गेलं. ते म्हणाले की, येथील वर्तमान तुमच्यासारख्या वीर जवानांच्या वीरतेचं जीवंत उदाहरण आहे. ते म्हणाले की, नौशेराच्या वाघांनी नेहमीच शत्रुला चोख उत्तर दिलंय. सर्जिकल स्ट्राइकमध्ये नौशेराच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. पंतप्रधान मोदी म्हणाले की, नौशेराच्या भूमीवर किती वीरांनी आपल्या रक्तानं आणि परिश्रमानं शौर्याची गाथा लिहिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram