PM Kissan Yojna : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, 10 कोटी शेतकऱ्यांना मदत
Continues below advertisement
केंद्र सरकारने नव्या वर्षाचा पहिला दिवस अन्नदात्याला समर्पित केलाय. पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलाय. देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आलीय. किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजारांचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. त्यातला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलाय. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आलेत.
Continues below advertisement