Pithoragarh: मतदारांना हेलिकॉप्टरमधून नेणार! उमेदवारांचं आश्वासन नाही तर बर्फवृष्टी ABP Majha

Continues below advertisement

निवडणुकीत उमेदवार मतदारांना आश्वासनांसह मोठमोठी आमिषंही दाखवतात. उमेदवारांनी दिलेल्या आश्वासनांची यादीही थक्क करणारी असते. पण उत्तराखंडच्या पिठौरागडमध्ये निवडणूक आयोगानच मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत हेलिकॉप्टरनं नेणार असल्याचं सांगितलंय. भारत-चीन सीमेवरील पिठौरागड जिल्ह्यातल्या मुनस्यारीमध्ये रस्ता बांधण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी साडेतीन हजार मजूर काम करतायत. तर बर्फवृष्टीमुळे इथले इतर रस्तेही बंद आहेत. मतदानाच्या तारखेपर्यंत रस्ता खुला होण्याची चिन्हं नसल्यानं बॉर्डर रोड ऑर्गनायझेेशनने या मजुरांना हेलिकॉप्टरमधून मतदान केंद्रावर नेण्याचा निर्णय घेतलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram