Pfizer AstraZeneca लशीची परिणामकारकता दहा आठवड्यानंतर कमी होते, द लॅन्सेट जर्नलचा सर्व्हे
Coronavirus Cases Today : भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. सध्या भारतात 40 हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधितांची दररोज नोंद केली जाते. सलग चौथ्या दिवशी देशात 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 39,361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 35,968 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.