Petrol Prices After Elections: पाच राज्यांतील निवडणुकीनंतर पेट्रेल, डिझेलचे भाव वाढणार? ABP Majha

Continues below advertisement

गेले तीन महिने स्थिर असलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव पाच राज्यांतील निवडणुकीनंतर वाढण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेत. या महागाईची झळ भारतातही बसणं अटळ आहे. यूक्रेन आणि रशियातील वादामुळे युद्धाचे ढग आहेत. आणि त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झालाय. २०१४ सालानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. तेलाचे दर वर्षभरात तब्बल ५६ टक्क्यांनी वधारलेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर जाण्याचा अंदाज आरबीआयनं देखिल व्यक्त केलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकानंतर देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढतील अशी शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram