Pegasus Controversy: पेगॅसस हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, चौकशी समितीची स्थापना
देशभरातील 40 हून अधिक पत्रकार आणि महत्वाच्या नेत्यांवर पाळत ठेवल्या प्रकरणी चर्चेत आलेल्या पेगॅसस स्पायवेअर संबंधी एक महत्वाचा आदेश काढणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं. एक स्वतंत्र समिती नेमून त्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शवली हाती आणि आता सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेत या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून, समितीत दोन सायबर एक्सपर्टचा समावेश केला आहे.