Pathankot Attack : पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर हल्ला ABP Majha

Pathankot Attack : पंजाब (Punjab) च्या पठाणकोट (Pathankot) मध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर हल्ला करण्यात आला आहे. आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी ग्रेनेड (Grenade) फेकल्याची माहिती मिळत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं सध्या दुचाकस्वारांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेचा कसून तपास सुरु आहे. 

पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला झाला आहे. दुचाकीस्वारांनी त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकत हा हल्ला केला आहे. त्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांकडून दुचाकीस्वारांचा शोध सुरु आहे. या हल्ल्यामुळे पठाणकोटमध्ये पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola