Parliament Winter Session 2021 : इंधन दरवाढ, लखीमपूर हिंसाचार आदी मुद्दे महत्त्वाचे ठरणार ABP Majha

Continues below advertisement

दिल्लीत उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि त्याआधी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत हेदेखिल बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात इंधन दरवाढ हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. याशिवाय लखीमपूरच्या घटनेनंतर गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक राहतील अशी चिन्हं आहेत. याशिवाय केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तो मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram