Parliament Monsoon Session:Pegasusप्रकरणी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही संसदेत रणकंदन होण्याची शक्यता

Continues below advertisement

नवी दिल्ली: इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगॅसस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जगभरातील दहा देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर करुन आपल्याच देशाच्या पत्रकार आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले आणि हेरगिरी केला असल्याचा आरोप अॅमनेस्टी इंटरनॅशनलने केला आहे.  ब्रिटनमधील वृत्तपत्र द गार्जियननं एक रिपोर्ट केला आहे. त्यात असा आरोप केला आहे की, पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, वकिलांसह काही महत्वाच्या व्यक्तिंची हेरगिरी केली जात आहे. यात भारताचाही समावेश असून भारतातील 40 हून अधिक पत्रकार, तीन विरोधी पक्षातील नेते, सरकारमधील दोन मंत्री, सुरक्षा एजन्सीमधील अधिकारी आणि काही उद्योजकांचा समावेश आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram