
Panjab : Congressमध्ये घमासान; 'आम्ही जी हुजूर 23 नाही', Kapil Sibal यांचा नेतृत्त्वावर निशाणा
Continues below advertisement
पंजाबमधल्या राजकीय घडामोडींनंतर काँग्रेसच्या नेत्यांनीच पक्ष नेतृत्त्वाला चागलंच घेरलं आहे. काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांच्या जी 23 गटानं पंजाबच्या कलहाच्या निमित्तानं नेतृत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. काँग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही, निर्णय कोण घेतंय हे आम्हाला ठाऊक नाही, असं वक्तव्य ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केलं आहे. आम्ही जी हुजूर नाही, या शब्दांत त्यांनी नेतृत्त्वावरही निशाणा साधला आहे.
Continues below advertisement