Pakistan LOC: 'एलओसी'वर पाकिस्तानचं अनधिकृत बांधकाम ABP Majha

चीनच्या पावलावर पाऊल टाकत आता पाकिस्ताननंही एलओसीवर बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. मात्र भारतानं त्वरित बांधकाम थांबवा नाही तर योग्य ती कारवाई करू अशी धमकी दिल्यानंतर पाकिस्ताननं बांधकाम थांबवल्याचं समजतंय. पाकिस्ताननं उत्तर काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्याच्या टिटवाल सेक्टरमध्ये एलओसीच्या ५०० मीटरच्या आत बांधकाम सुरु केलं होतं. मंगळवारी म्हणजे आज टिटवालमधील गावकऱ्यांनी जेव्हा भारतीय सैन्याला याची माहिती दिली तेव्हा लगेचच  पाकिस्तानला इशारा देण्यात आला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola