Padma Awards 2022 : गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण,तर सुलोचनादीदींचा ‘पद्मश्री’ने सन्मान!

Continues below advertisement

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
अभिनेते व्हिक्टर बॅनर्जी, ओडिया लेखिका डॉ. प्रतिभा रे, प्रसिद्ध विद्वान आचार्य वशिष्ठ त्रिपाठी, आणि भारत बायोटेकचे संस्थापक डॉ. कृष्णा एला व पत्नी सुचित्रा एला यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, गायक सोनू निगम यांचा पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश होता. श्रीगुरु डॉ बालाजी तांबे यांनाही  औषधी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री (मरणोत्तर) पुरस्काराने गौरवण्यात आले. यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने जानेवारी महिन्यात केली होती.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram