INX Media Case | माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर | ABP Majha
Continues below advertisement
INX Media घोटाळाप्रकरणी गेल्या 106 दिवसांपासून दिल्लीतील तिहार जेलमध्ये असेलले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दोन लाखांच्या जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. यावेळी चिदंबरम यांना ईडीला चौकशीत संपूर्ण सहकार्य करण्याचं आणि देशाबाहेर न जाण्याची अट सुप्रीम कोर्टानं घातली आहे. मागील 106 दिवसांपासून पी. चिदंबरम हे तिहार तुरुंगात होते. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात पी. चिदंबरम यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. पण याआधीचं सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे.
Continues below advertisement