Morbi Bridge Collapse Case : मोरबी पूल बळींच्या कुटुंबाला कायमस्वरुपी भरपाई द्या, ओरेवा समूहाला आदेश

मोरबी येथील पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील वृद्धांना कायमस्वरुपी निवृत्ती वेतन तसंच विधवांना नोकरी द्यावी असे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने ओरेवा समूहाला दिले आहेत.
मोरबी येथे 30 ऑक्टोबर 2022 ला ही पूल दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 135 नागरिकांचा मृत्यू झाला होता. सरकारी आकड्यांनुसार, यात 10 महिलांना वैधव्य प्राप्त झालं होतं आणि सात मुलं अनाथ झाली होती. त्यामुळे खंडपीठाने ओरेवा कंपनीला त्यांच्या पुढील निर्वाहासाठी ठोस पावलं उचलण्याचे आदेश दिले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola