Jaish e Mohammed | ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या हल्ल्यात 'जैश'चे अड्डे उद्ध्वस्त Special Report
Operation Sindoor target complete Jaish e Mohammed | ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या हल्ल्यात 'जैश'चे अड्डे उद्ध्वस्त
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचं महत्वाचं टार्गेट होतं ते सीमाभागातले दहशतवादी आणि त्यांचे अड्डे. भारतानं हे तळ उद्ध्वस्त करुन दहशतवादाचं कंबरडं मोडलंय. इतकंच नव्हे तर शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केलंय. त्यात जैश ए मोहम्मदसारख्या संघटनांचं संपूर्ण नेटवर्कच उद्ध्वस्त झालंय.पाहूयात याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट...
१९७१ नंतर पहिल्यांदाच भारताचं वायूदल... सैन्यदल आणि नौदल एकत्र लढलं... पाकिस्तान आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारतानं दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं भारतानं सर्वात जास्त तडाखा दिला तो कुख्यात दहशतवादी संघटना
६ मेच्या मध्यरात्री भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यात बहावलपूर आणि सियालकोटमधल्या जैशच्या या महत्वाच्या अड्ड्यांचा समावेश होता...
जैशच्या अड्ड्यांवर काय चालतं?
बहावलपूर आणि सियालको जैशच्या बहावलपूर अड्ड्यावर शस्त्र आणि दारुगोळा साठवणूक जैशच्या कमांडर्सचा शस्त्र खरेदी आणि तस्करीचा महत्वाचा अड्डा दहशतवाद्यांना आत्मघातकी हल्ले करण्याचं प्रशिक्षण दहशतवाद्यांसी संपर्क, त्यांच्या घडामोडींवर लक्ष ठेवणं