Amit Shah Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव'ची इनसाईड स्टोरी, अमित शाहांनी सगळं सांगितलं
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह २६ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने 'ऑपरेशन महादेव' सुरू केले. या ऑपरेशन अंतर्गत काल तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत 'ऑपरेशन महादेव'ची रणनीती आणि इनसाइड स्टोरी सांगितली. ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान उर्फ फैजल झक, अफगान आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले. सुलेमान हा लश्कर-ए-तोयबाचा 'ए' श्रेणीचा कमांडर होता आणि तो पहलगाम तसेच गगनगिर हल्ल्यात सामील होता. अफगान आणि जिब्रान हे देखील 'ए' श्रेणीचे दहशतवादी होते. "ज्यांनी बेशरंग घाटीमध्ये आमच्या प्रवाशांना, नागरिकांना मारलं होतं, हे तिन्ही आतंकवादी हे होते आणि तिन्ही मारले गेले," असे लोकसभेत सांगण्यात आले. भारतीय सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे हे अभियान राबवले.