Pune Drugs Party | दोन महिलांकडे अंमली पदार्थ दऊन Pranjal Khemalkar यांना अडकवलं, वकीलांचा युक्तीवाद
प्रांजल खेमलकर यांना अमली पदार्थ प्रकरणात अडकवण्यात आल्याचा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. वकील विजयसिंह ठोंबरे यांनी हा दावा केला. खेमलकर यांना अडकवण्यासाठी आरोपी ईशा सिंगचा वापर करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कोर्टात रोहिनी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रुपाली ठोंबरे पाटील उपस्थित आहेत. सरकारी वकील प्रांजल खेमलकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करत आहेत. मात्र, आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या युक्तिवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन महिला आरोपींकडे कोकेन हे ड्रग्ज जाणूनबुजून आणण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे. फॉरेन्सिक अहवाल जाणूनबुजून उशीर केले जात आहेत, जेणेकरून खेमलकर यांना पोलीस कोठडीत ठेवता येईल आणि त्यांना जामीन मिळणार नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे.