Vaccination In India : देशात लसीकरणाचा नवा विक्रम, आज दिवसभऱ्यात 1 कोटी 16 लाख जणांचं लसीकरण पूर्ण
Continues below advertisement
नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. देशात शुक्रवारी (31 ऑगस्ट) एकाच दिवशी जवळपास 1.09 कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे संध्याकाळी पाच पर्यंत कोविड-19 लसीकरण करण्यात आले असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. एका दिवसातील आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री
मनसुख मंडावीया यांनी ट्वीट करत दिली आहे.
भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आज 1.09 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्यमंत्र्यानी ट्वीट करत देशातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. आतपर्यंत एका दिवसातील लसीकरणाच्या आकडेवारीतील ही सर्वात जास्त संख्या आहे.
Continues below advertisement