One Day Cricket: वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, के एल राहुलकडे कर्णधारपद ABP Majha

दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. विराट कोहलीला कर्णधारपदावरुन पायउतार केल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व देण्यात आलं. पण रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे के. एल राहुलकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा दक्षिण आफ्रिाकविरोधातील एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्याजागी के. एल. राहुलकडे कर्णधापद सोपवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला.  तर शिखर धवनचे पुनरागमन झालं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola