Ola Motors: ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो स्कूटर बाजारात ABP Majha
Continues below advertisement
ग्राहकांना पोस्ट-बुकिंग डिलिव्हरीमध्ये विलंब झालेल्या ओला स्कूटरची प्रतीक्षा आता खरोखरचं संपणार आहे. कारण 'गड्डी निकल चुकी' या कॅप्शनसह एक व्हिडिओ ट्विट करून, ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी ओला एस1, एस1 प्रो गाड्यांची डिलेव्हरी उद्यापासून म्हणजे 15 डिसेंबर 2021 पासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. या कंपनीने ओला एस वन आणि ओला एस वन प्रो S1 अशा दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. यातील ओला एस वनची किंमत महाराष्ट्रात ९४ हजार९९९ रुपये तर ओला एस वन प्रोची किंमत महाराष्ट्रात 1 लाख 24 हजार 999 रुपये ठरविण्यात आली आहे. यामध्ये ओला एस१ ही एकदा चार्ज केली की ९० किमीच्या स्पीडने १२० किलोमीटर तर ओला एस वन प्रो ११५ किमीच्या स्पीडने १८० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असा कंपनीने दावा केला आहे.
Continues below advertisement
Tags :
CEO Launch Tweet Delivery Ola Ola Scooter Ola S1 Post-booking Delay Waiting Caption Bhavish Agarwal S1 Pro