Mehul Choksi : मेहुल चोक्सीच्या मुंबईतील घराबाहेर नोटिशींचा खच, नव्या नोटिशीसाठी जागाच उरली नाही
Mehul Choksi : मेहुल चोक्सीच्या (Mehul Choksi) या अपहरणाच्या ड्रामामध्ये एक 'मिस्ट्री वूमन आहे. ही महिला चोक्सीची गर्लफ्रेंड असून तिलाच भेटण्यासाठी चोक्सी डोमिनिकाला गेल्याची माहिती होती. मात्र तपासामध्ये हे स्पष्ट झाले की मेहुल चोक्सी डोमिनिका येथे आला तेव्हा एका महिलेबरोबर होता. पण ती त्याची मैत्रीण नव्हती. फरार व्यवसायिकाच्या जवळच्या सूत्रांनी एबीपी माझाला सांगितले की, चोक्सीच्या अपहरण करणाऱ्या गॅंगची ती महिला सदस्य होती.