Nobel Prize 2021 in Medicine : डेव्हिड ज्युलिअस आणि अॅर्डेम पटापाउटियन यांना औषधशास्त्रामध्ये नोबेल

Continues below advertisement

नवी दिल्ली : औषधशास्त्रामध्ये यावर्षीचा म्हणजे वर्षीचा 2021 चा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाले आहे.  अमेरिकेचे शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलिअस  (David Julius)  आणि अॅर्डेम पटापाउटियन (Ardem Patapoutian) यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे.  

अमेरिकेचे शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलिअस आणि अॅर्डेम पटापाउटियन यांना तापमान आणि स्पर्शामधील रिसेप्टर्सच्या संशोधनासाठी संयुक्तपणे नोबेल मेडिसीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्टॉकहोममधील  (Stockholm) करोलिंस्का संस्थेच्या (Karolinska Institute) एका पॅनेलद्वारे घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मेडिसीनमध्ये हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना देण्यात आला होता. . रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या संशोधनासाठी गेल्या वर्षी या कॅटेगरीमध्ये नोबेल पुरस्कार  देण्यात आला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram