क्रिप्टोकरन्सीवर कर लावला म्हणजे त्याला कायदेशीर मान्यता दिली असं नाही : Nirmala Sitaraman
Continues below advertisement
क्रिप्टोकरन्सीवर कर लावला म्हणजे त्याला कायदेशीर मान्यता मिळाली याचा अर्थ त्याला कायदेशीर मान्यता मिळाली असं नाही. हे स्पष्टीकरण आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं. सीतारमण यांनी काल राज्यसभेत बोलताना हे भाष्य केलं. आभासी डिजिटल व्यवहारांवर कर लावणं हा भारत सरकारचा सार्वभौम अधिकार आहे, असंही त्यांनी सांगितलं. देशात क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालायची की नाही याचा निर्णय चर्चा करून घेतला जाईल असंही सीतारमण यांनी सांगितलं. क्रिप्टोकरन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लावण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलीय. त्यानंतर अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना सीतारमण यांनी ही माहिती दिलीय.
Continues below advertisement