Nirbhaya Rape case | दोषींच्या फाशीला पटियाला हाऊस कोर्टाची स्थगिती, उद्याची फाशी टळली | ABP Majha
2012 दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना उद्या दिल्या जाणाऱ्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने दिली पुढच्या आदेशापर्यंत दोषींच्या फाशीला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश कुमारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानंतर या सर्व आरोपींना उद्या, 1 फेब्रुवारी रोजा फाशी होण्याचे निश्चित झाले होते. मात्र आता या नराधमांची फाशी उद्यासाठी टळली आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने पुढच्या आदेशापर्यंत दोषींच्या फाशीला स्थगिती दिली आहे. राष्ट्रपतीं