Two Wheeler Rules: लहान मुलांच्या सुरक्षेसाठी वाहतूक मंत्रालयाचा नवा कायदा, काय आहे नव्या नियमावलीत?
आता दुचाकीवर मुलं पाठीमागे बसलेली असताना दुचाकी 40 किमीपेक्षा जास्त वेगानं चालवण्यास मनाई असेल. जर दुचाकीचा वेग 40 किमीपेक्षा वाढला तर ते वाहतूक नियमांचं उल्लंघन समजलं जाईल. हा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं तयार केलाय. याच प्रस्तावात 9 महिने ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना क्रॅश हेल्मेट घातलं गेलं पाहिजे, याची चालकानं नोंद घ्यावी अशी तरतूदही करण्यात आली आहे. केंद्रीय मोटर वाहन नियमावलीतील नव्या तरतुदींसह केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयानं पारित केला आहे.
Tags :
Traffic Rules Helmet Compulsion Two Wheelers Rules Traffic Rules For Kids. Kids Traffic Safety