Netaji Subhash Chandra Bose यांची 125वी जयंती, इंडिया गेटवरील पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण
Continues below advertisement
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती... याचनिमित्त इंडिया गेटवरील पुतळ्याचं आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली होती. इंडिया गेट येथे बोस यांचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. हे सुभाषचंद्र बोस यांच्या योगदानाबद्दलच्या कृतज्ञतेचं प्रतिक असेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. ग्रॅनाइटच्या पुतळ्याचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम प्रतिमा बसवण्यात येणार आहे.
Continues below advertisement