Nepal Pokhara Plane Crash : नेपाळ विमान दुर्घटनेत 4 प्रवाशांचा अद्याप शोध नाही,Rescue Operation सुरु
नेपाळ विमान दुर्घटनेतील चार मृतदेहांचा अद्याप शोध लागलेला नाही.. ज्या पोखरा परिसरात ही दुर्घटना घडली त्याठिकाणी काठमांडूमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी पोहचले आहेत.. विमान दुर्घटनेत पाच भारतीयांचाही मृत्यू झालाय.. ओळख पटताच हे मृतदेह उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये आणण्यात येतील. दरम्यान पोखरामध्ये सुरु असलेल्या ऑपरेशनचा आढावा घेतलाय एबीपी न्यूजचे प्रतिनिधी संजय त्रिपाठी यांनी