Natural Gas Prices : Petrol-Diesel, CNG पाठोपाठ नैसर्गिक वायुचा भडका; 62 टक्क्यांनी महाग

Continues below advertisement

पेट्रोल-डिझेल महागलं... त्यानंतर घरगुती एलपीजी गॅसही महागला... आणि आता सीएनजी आणि घरगुती पाईप गॅस महागणार आहे.. त्यामागचं कारण म्हणझे नैसर्गिक वायुची किंमत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 62 टक्क्यांनी वाढली आहे.. याचा परिणाम सीएनजी आणि घरगुती पाईप गॅसबरोबरच वीजनिर्मितीवरही होणार आहे.. तसंच मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील ओला-उबर सारख्या टॅक्सी सेवा देखील महागण्याची शक्यता आहे... कारण बहुतांश ओला-उबर चालक हे सीएनजीचा वापर करतात..  नैसर्गिक वायुची किंमत दर सहा महिन्यांनी, म्हणजे 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरला निश्चित होत असते.. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक वायुची किंमत वाढवल्यानं ओएनजीसीच्या तिजोरीत वर्षाला 5 हजार 200 कोटी रुपयांची अधिकची भर पडणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram