महामार्गांवर वेगमर्यादेचे फलक लागणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानंच बोर्ड लावण्याचं काढलं पत्रक
Continues below advertisement
केंद्रानं संशोधित मोटार वाहन कायद्याअंतर्गत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर नवीन दंड आकारणी लागू केली आणि त्यानंतर राज्यातल्या महामार्गांवर वेगमर्यादा किती याचा प्रश्न निर्माण झाला. कुठेही वेगमर्यादा दाखवणारे बोर्डदेखिल नव्हते त्यामुळे एबीपी माझानं या संदर्भातलं वास्तव समोर आणल्यानंतर आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानंच बोर्ड लावण्याचं पत्र काढलं आहे. केंद्राच्या नियमानुसार 100 च्या स्पीडलिमिटचे लावायचे की राज्यसरकारच्या नियमानुसार 90 च्या या बाबत मात्र अजूनही संभ्रम कायम आहे.
Continues below advertisement