Narayan Rane PC : मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्याला न्याय देण्याचं काम करेन : नारायण राणे

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातून भाजप खासदार नारायण राणे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षप्रमुख जे पी नड्डा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे आभार मानले. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. आता वरिष्ठ देतील ती जबाबदारी सांभळण्यास मी तयार आहे. माझा नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास दोन मिनिटांत सांगणे सोपं नाही. मी आतापर्यंत अनेक पदं भूषवली आहेत. मंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम करणार, असेही नारायण राणे म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola